Post Office : पोस्टाच्या ‘या’ योजनेत ‘इतक्या’ दिवसांत मिळेल 8 लाख रुपये, जाणून घ्या कोणती?

Published on -

Post Office : सध्याच्या काळात लोकांच्या गरजा खूप वाढल्या आहेत, त्यामुळे लोक वेळोवेळी अशा गुंतवणूक योजना शोधत राहतात ज्यामध्ये त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि त्यांना हमी परतावा मिळत राहील. तुम्हालाही अशातच योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

भारतीय पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये कोणतीही जोखीम नाही, आणि तुम्ही येथे जबरदस्त परतावा देखील कमावू शकता. आज आम्ही पोस्टाच्या अशाच एका योजेनबद्दल सांगणार आहोत, ज्याचे नाव आवर्ती ठेव योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. सध्या मोदी सरकार यावर ६.७ टक्के व्याज देत आहे. सरकारने हे व्याजदर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू केले आहेत.

अशा प्रकारे करा गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या या आवर्ती ठेव योजनेत दरमहा 5,000 रुपये गुंतवल्यास, 5 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 3 लाख रुपये जमा होतील. येथे 6.7 टक्के व्याजाची रक्कम 56,830 रुपये एवढी होईल, अशा प्रकारे गुंतवणूकदाराला एकूण रक्कम आणि व्याज मिळातून 3,56,830 रुपये नफा होईल.

तुम्ही तुमची आवर्ती ठेव योजना आणखी 5 वर्षांसाठी वाढवल्यास, तुम्हाला पुढील 10 वर्षांत 6,00,000 रुपये मिळतील. ज्यामध्ये 2,54,272 रुपये व्याज आणि 8,54,272 रुपये तुमची गुंतवणूकअसेल.

कर्ज सुविधा

या योजनेत तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते, मात्र यासाठी तुम्हाला या पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये सलग 12 हप्ते जमा करावे लागतील. 1 वर्षानंतर, तुम्ही तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकता.

आवृत्ती ठेव योजनेचे इतर फायदे :-

-आरडी खात्याची परिपक्वता 5 वर्षे आहे. परंतु, प्री-मॅच्युअर क्लोजर ३ वर्षांनी करता येते.
-या योजनेच्या मुदतपूर्तीनंतर, तुम्ही आरडी खाते पुढील 5 वर्षे सुरू ठेवू शकता.
-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेमध्ये एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते.
-एकट्या व्यक्तीशिवाय, येथे जास्तीत जास्त 3 व्यक्तींसाठी संयुक्त खाते उघडता येते.
-विशेष म्हणजे मुलाच्या नावाने खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
-या योजनेत तुम्हाला तिमाही चक्रवाढ व्याज दिले जाते.
-या योजनेत तुम्ही फक्त 100 रुपये गुंतवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe