Ahmednagar News : पती पत्नीचे अपहरण, घरात हातपाय बांधून पाच तास छळ, प्लास्टिक पिशवी तोंडात घालून खून, मृतदेह दगड बांधून विहिरीत.. ‘असा’ घडला वकील दाम्पत्यांसोबत थरार

Published on -

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अपहरण झालेल्या वकील दाम्पत्यांची निघृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. या वकील दाम्पत्याचे मृतदेह उंबरे गावातील आमरधाम परीसरातील एका विहिरीमध्ये दगड बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. २५ जानेवारी रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडात अॅड. राजाराम जयवंत आढाव आणि अॅड. मनीषा राजाराम आढाव यांचा मृत्यू झाला.

वकीली व्यवसायातून वैमनस्य वाढल्याने आर्थिक हव्यासापोटी आरोपींनी हे क्रौर्य केल्याची चर्चा आहे. दि. २५ जानेवारी रोजी राहुरी न्यायालयासमोर मानोरी येथील संशयरीत्या चार चाकी गाडी आढळून आली होती. त्यांनंतर आढाव दांपत्यांचे सिनेस्टाईल अपहरण झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली होती. राहूरी पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवान तपासाची चक्रे फिरवली.

जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने गतीमान तपास करत आरोपी समोर आणले. तातडीने काही आरोपीना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस खाक्या दाखवतात आरोपीने खुनाच्या गुन्हयाची कबुली दिली.

आढाव दाम्पत्याची हत्या करून हात-पाय बांधुन, मृतदेहाला मोठ-मोठाली दगड बांधून उंबरे येथील एका विहरीत फेकून दिल्याचे समजतात पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास हे मृतदेह वर काढण्यात आले. पुढील काही तासांत चार आरोपी पोलिसांची ताब्यात घेतले.

सिनेस्टाइल ‘प्रि’प्लॅन मर्डर

वकिलांची हत्या हा सिनेस्टाइल प्रिप्लॅन मर्डर असल्याची चर्चा आहे. अॅड. आढाव हे न्यायालयात कामकाज करत असताना भर दिवसा त्यांचे चार चाकी गाडीतून अपहरण झाले. त्यांनंतर त्यांच्या पत्नीला देखील फोन करून बोलुन घेऊन त्यांच्या राहत्या घरी आणले. हात-पाय बांधून तोंडात बोळा कोंबून दिवसभर त्यांना घरीच ओलीस ठेवले. त्यांचा छळ केला. त्यांनंतर चारचाकी गाडीतून त्यांना निर्जनस्थळी नेण्यात आले.

तोंडावर प्लास्टिकच्या पिशव्या घालून दोरीने गळा आवळून त्यांची खुन करण्यात आला. त्यांनंतर मृतदेह गाडीत टाकून उंबरे परीसरात मृतदेहाला दगड बांधून एका विहिरीत फेकून दिले. पुन्हा आढाव यांची चार चाकी गाडी न्यायालय परिसरात सोडून दिली. याचा अर्थ आरोपींनी हे शांत डोक्याने कुत्य करून खून करून पुरावा नष्ट करून अपहरण झाल्याचा बनाव केल्याची चर्चा रंगली आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार

या घटनेतील किरण नामक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची चर्चा आहे. या आरोपीवर या पाठीमागे अनेक
प्रकारे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अपहरण, खंडणी, खून, यासारखे गुन्हे करत असल्याची देखील चर्चा आहे.

मानोरीत कडकडीत बंद

आढाव दांपत्याची हत्या झाल्याने मानोरी परिसरात शोककळा पसरली आहे. मानोरी पेथील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध सभा घेतली. आढाव यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News