अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- बाहुबली’ या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाचे दोनही भाग प्रचंड गाजले. या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीने एक गोड बातमी दिली आहे.
चाचा नुकताच साखरपुडा झाला आहे. मिहिका बजाज हे राणाच्या भावी पत्नीचे नाव आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राणाने 12 मे रोजी इंस्टाग्रामवर पहिल्यांदा मिहिकासोबतचा फोटो शेअर करुन ‘तिने होकार दिला आहे’, अशी रोमँटिक पोस्ट शेअर केली होती.
त्यानंतर दोघे लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता 20 मे रोजी साखरपुडा करुन हे दोघे ऑफिशिअली एंगेज्ड झाले आहेत.
राणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर साखरपुड्याचे दोन फोटो शेअर करुन ‘And it’s official!!’, असे ट्विट केले आहे. साखरपुड्याला मिहिका पारंपरिक वेशभूषेत अतिशय सुंदर दिसली.
राणाने या खास दिवशी पांढरा शर्ट आणि मुंडू परिधान केला होता. राणाचे वडील सुरेश बाबू यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, राणाचं लग्न हिवाळ्यात करण्यात येणार आहे.
या लग्नाची तयारीसुद्धा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मिहिका ही बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची अतिशय जवळची मैत्रीण आहे.
सोनमच्या लग्नात मिहिकाने उपस्थिती लावली होती. राणा आणि मिहिकाने त्यांच्या नात्याची कबुली दिल्यानंतर सोनमने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com