जिल्ह्यात गाजत असलेल्या राहुरी तालुक्यातील अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याच्या खूनप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी कार्यकत्यांसह भेट घेऊन संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
याबाबत कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव दाम्पत्याचा खून झाला. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून इतक्या निर्घृणपणे एखाद्याला जीवे मारणे निर्दयीपणा आहे.
या घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपींची योग्य प्रकारे चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा म्हणजे फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी आपण गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची प्रमुख कार्यकत्यांसह भेट घेऊन करणार असल्याचे
तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती देखील करणार असल्याचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले आहे.