अहमदनगर जिल्ह्यातील नऊ जण झाले नायब तहसीलदार !

Ahmednagarlive24 office
Updated:

जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित असलेल्या जिल्हा महसूल विभागातील अव्वल कारकून-मंडलाधिकारी संवर्गातील नऊ जणांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती देण्यात आली. याबाबतचे आदेश सोमवारी (दि.२९) रोजी राज्याच्या महसूल व वन विभागातमार्फत जारी करण्यात आले आहेत.

शासकीय सेवेत नियमानुसार ठराविक कालखंडानंतर पुढील पदावर पदोन्नती दिली जाते. या नियमानुसार सोमवारी राज्यातील महसूल विभागातील मंडलाधिकारी अव्वल कारकून संवर्गातील महसूलच्या सेवकांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती देण्यात आली. नाशिक विभागातील एकूण ३६ जणांचा तर जिल्ह्यातील नऊ जणांचा यात समावेश आहे.

पुरवठा शाखेत अव्वल कारकून असलेले विशाल सदनापूर यांना पदोन्नतीसह राहुरी तहसील कार्यालय निवडणूक नायब तहसीलदार पदी नेमण्यात आले आहे. महसूल शाखेतल्या अव्वल कारकून वनिता कल्हापुरे यांची श्रीरामपूर प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार अर्थात शिरस्तेदार पदी नेमणूक करण्यात आली आहे.

पदोन्नतीनंतर नालेगाव मंडलाधिकारी असलेल्या राजेंद्र बकरे यांची नियुक्ती शेवगाव तहसील कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदार पदी करण्यात आली आहे. मंडलाधिकारी दत्तात्रय शेकटकर यांची नेमणूक श्रीरामपूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार पदी करण्यात आली आहे.

अव्वल कारकून दीपक कारखिले यांची नेमणूक पदोन्नतीसह शेवगाव तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार पदी करण्यात आली आहे. नगर तहसीलमध्ये अव्वल कारकून पदी कार्यरत असणाऱ्या अमोल बन यांची पदोन्नतीनंतर नेमणूक श्रीगोंदा तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार पदी करण्यात आली आहे.

अव्वल कारकून चंद्रकांत कुलथे यांची नेमणूक पदोन्नतीसह कोपरगाव तहसील कार्यालयात महसूल नायब तहसीलदार पदी करण्यात आली आहे. किसन लोहरे यांची नियुक्ती अकोले तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार पदी करण्यात आली आहे. विजय दगडखैर यांची नेमणूक पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार पदी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe