मी कर्जाला कंटाळलोय, आता काय करावे हे समजत नाही. यातून बहेर पडणे शक्य नाही… शेतकऱ्याची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Updated:

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील शेतकरी अरुण भानुदास कंठाळी (वय ४२), यांनी कर्जाला कंटाळूनन स्वतःच्या शेतामधील लिंबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी ही घटना घडली.

उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा सुसरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण कंठाळी यांच्याकडे सेवा सहकारी संस्था, खासगी बँकांचे व उसणवारीचे मोठे कर्ज होते. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न व मुलींचे बाळांतपण, शेतीचा खर्च, यामुळे कंठाळी कर्जबाजारी झाले होते.

त्यांनी काही जमीनही विकली होती. तरीही कर्ज होतेच. मी कर्जाला कंटाळलोय, आता काय करावे हे समजत नाही. यातून बहेर पडणे शक्य नाही, असे कंठाळी यांनी त्यांच्या घरातील लोकांना दोन दिवसांपूर्वीच बोलून दाखवले होते. पोलिसांनी पंचनामा केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe