2024 हे वर्ष सुरू झाले असून जानेवारी या पहिल्या महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे व परवापासून एक फेब्रुवारी 2024 म्हणजेच दुसऱ्या महिन्याची सुरुवात होणार आहे. या येणाऱ्या 1 फेब्रुवारीपासून काही महत्त्वाच्या गोष्टींच्या नियमांमध्ये सरकारकडून बदल करण्यात येणार आहे व त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या सदस्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
विशेष म्हणजे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून याबाबत एक अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे व त्यामुळे आता एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टम खातेधारकांना त्यांच्या खात्यातून जर पैसे काढायचे असतील तर त्यासाठी असलेल्या नियमांमध्ये बदल होणार असल्याने ते नियम पाळूनच आता पैसे काढता येणार आहे.
एक फेब्रुवारीपासून एनपीएस खातेधारकांसाठी पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे व त्यानुसार आता नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सदस्यांना आता खात्यातून पैसे काढण्याकरता असलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार असून त्यानुसार आता या खातेदारांना पुढील महिन्यापासून जी काही रक्कम जमा होईल त्या रकमेपैकी खात्यातून फक्त 25% रक्कम काढता येणे शक्य होणार आहे.
यामध्ये पेन्शन फंड नियामक आणि प्राधिकरणाने 12 जानेवारी 2024 रोजी जे काही परिपत्रक जारी केले होते त्यानुसार आता एनपीएस खातेधारक त्यांच्या मुलांचे लग्न किंवा शिक्षण, घराची खरेदी, वैद्यकीय खर्च इत्यादीं करिता त्यांच्या खात्यामध्ये जी काही रक्कम जमा असेल त्यापैकी 25% रक्कम काढू शकणार आहेत.
याशिवाय जर स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर त्यासाठी देखील एनपीएस खात्यातून आता पैसे काढता येणार आहेत. यामध्ये खातेदार आणि नियोक्ता या दोघांचीही रक्कम समाविष्ट करण्यात आलेली असून हा नवीन नियम एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
आता काही दिवसांमध्येच खातेदारांच्या खात्यात पैसे होतील ट्रान्सफर
समजा एनपीएस खातेधारकाला जर त्याच्या खात्यातून आंशिक पैसे किंवा रक्कम काढायचे असेल तर त्याकरिता सर्वात अगोदर सुरक्षित घोषणे सह पैसे काढण्याची विनंती सबमिट करणे गरजेचे राहील व जर खातेदार कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर मास्टर परिपत्रकाच्या पॅरा 6(डी) अंतर्गत त्याच्या कुटुंबातील सदस्याला आंशिक पैसे काढण्यासाठी पैसे काढण्याची विनंती सबमिट करण्याचा अधिकार आहे व ही विनंती करताना खातेदाराला पैसे काढण्याच्या कारणाची माहिती देणे गरजेचे आहे.
त्यानंतर सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी म्हणजे सीआयए या पैसे काढण्याचे विनंतीची चौकशी करेल व त्यावर आवश्यक प्रक्रिया केली जाणार असून सर्व माहिती बरोबर दिसून आल्यास काही दिवसात खातेधारकाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. खात्यातून आंशिक पैसे काढण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण करणे देखील गरजेचे आहे.
जसे की, नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच एनपीएस खात्यातून तुम्हाला पैसे काढायचे असेल तर खाते कमीत कमी तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जुने असणे गरजेचे आहे. तसेच तुमची खात्यातून काढलेली रक्कम तुमच्या खात्यामध्ये जी काही रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेच्या एक चतुर्थांपेक्षा जास्त नसावी. तसेच एक ग्राहक फक्त तीन वेळा खात्यातून आंशिक पैसे काढू शकतो.