Ahmednagar News : अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या ओबीसी मेळाव्यात अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नेवासा तालुका सकल मराठा बांधवांनी त्यांचा तीव्र निषेध केला.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे अॅड. के.एच. वाखुरे, भाऊसाहेब वाघ, अनिल ताके, दिपक धनगे, बंडू शिंदे, गणेश चौगुले, संदीप आलवणे आदींनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन त्याचे वाचन केले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळातील एक मंत्री भुजबळ यांनी अहमदनगर येथे झालेल्या सभेत अतिशय खालच्या भाषेत चिथावणीखोर भाषण करून दोन नव्हे तर सर्वच समाजात तेढ निर्माण होईल,
असे वक्तव्य केले आहे. त्यांनी मराठा समाजाची न्हावी, समाजाने हजामती करू नये, असे आवाहन करून या दोन समाजात तेढ निर्माण केली आहे.