Gold Silver Price Today : आज तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असाल तर चांगली बातमी आहे. आज बुधवारी (7 फेब्रुवारी) सोन्याच्या दरात घट झाली आहे. सराफा बाजार उघडल्यानंतर सोने 200 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे, तर चांदी 700 रुपयांनी कमी झाली आहे. चला तर मग तुमच्या शहरात सोने आणि चांदी किती रुपयांची स्वस्त झाले पाहुयात.
सराफा बाजाराने बुधवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 7 फेब्रुवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,230 रुपये, 24 कॅरेटचा भाव 62,480 रुपये, तर 1 किलो चांदीची किंमत 70000 रुपये आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत
आज बुधवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे तर, दिल्ली सराफामध्ये आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,900 रुपये आहे. तर मुंबई सराफा बाजारात 58,500 रुपये आहे. आणि पुणे बाजारात 57,750 रुपये असा आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
आज बुधवारी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज दिल्ली सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,150 रुपये आहे. मुंबई सराफा बाजारात किंमत 63,820 रुपये आणि पुणे सराफा बाजारात किंमत 63,820 रुपये अशी आहे.
1 किलो चांदीची नवीनतम किंमत
आज बुधवारी, मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 73,500 रुपये आहे, तर पुण्यात 1 किलो चांदीची किंमत 78,000 रुपये अशी आहे.