Senior Citizen FD Interest Rate : वाढती महागाई पाहता आज प्रत्येकाला भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अडचणीवर सहज मात करता येईल. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु असे काही पर्याय आहेत ज्यात बाजार जोखीम देखील समाविष्ट आहे.
पण गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये एफडी हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. कारण त्यात मार्केट रिस्क नसते. याशिवाय, निश्चित व्याजदराने निर्धारित वेळेत परतावा देखील मिळतो. अशातच जर तुम्ही सध्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही बँकांच्या व्याजदराबद्दल सांगणार आहोत, ज्या ज्येष्ठ नागरिकांना सार्वधिक परतावा देत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका !
बँक ऑफ बडोदा
ही बँक तीन वर्षांच्या एफडीवर ७.७५ टक्के दराने व्याज देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहे. येथे 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांत 1.26 लाख रुपये मिळतील. म्हणजेच येथे व्याजतूनच बक्कळ कमाई होईल.
ॲक्सिस बँक
ही बँक देखील ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याजदर ऑफर करत आहे. बँक ७.६० टक्के दराने व्याज देत आहे. येथे तीन वर्षांसाठी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक वाढून 1.25 लाख होईल.
पंजाब नॅशनल बँक
या बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.५० टक्के व्याजदरासह परतावा देतात. येथील तीन वर्षांनंतर परतावा 1.25 लाख रुपये होईल.
ICICI आणि HDFC बँक
या दोन्ही बँका तीन वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर देत आहेत. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली तर त्याला कालावधी संपल्यानंतर 1.25 लाख रुपयांचा परतावा मिळेल.