आनंदाची बातमी ! पुण्याहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मंजुरी, कसा राहणार रूट?

Ahmednagarlive24 office
Published:

Pune Vande Bharat Express : गेल्या काही महिन्यांपासून प्रसारमाध्यमांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. ही गाडी प्रवाशांमध्ये मोठी लोकप्रिय झाली आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.

आत्तापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुण्याला देखील वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मात्र, अजूनही सांस्कृतिक राजधानी पुण्याहून थेट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाहीये. मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन पुणे मार्गे चालवली जात आहे.

दरम्यान, आता पुण्याहून थेट वंदे भारत एक्सप्रेस धावणार अशी बातमी समोर येत आहे. पुणे ते बेळगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. दरम्यान हा पाठपुरावा आता यशस्वी झाला आहे.

या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्यास केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे. इराण्णा कडाडी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे बेळगाव ते पुणे हा प्रवास सोयीचा होणार आहे.

खरेतर बेळगावहुन पुण्यात मोठ्या प्रमाणात शिक्षणानिमित्त कामानिमित्त आणि उद्योगानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सारखी हाय स्पीड ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी होती. हीच मागणी आता पूर्ण झाली आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, या गाडीला केव्हा हिरवा झेंडा दाखवला जाणार, या मार्गावर प्रत्यक्षात ही गाडी केव्हा सुरू होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महाराष्ट्राला किती वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत?

आतापर्यंत महाराष्ट्राला सात वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गोवा, मुंबई ते जालना, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. दरम्यान, आता पुणे ते बेळगाव या मार्गावर देखील ही गाडी सुरू होईल हे जवळपास नक्की झाले आहे. यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आणखी वाढणार आहे. परिणामी राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी जलद होईल आणि राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe