Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे या आधीही समोर आले आहे. आता अहमदनगरमध्ये डीवायएसपी यांच्या पंथाने मोठी कारवाई केली.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घारगाव व तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला.
मंगळवारी रात्री साडेदहा वाजता संयुक्त कारवाई करून पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार पीडित तरुणींची सुटका करून ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोखरी बाळेश्वर शिवारात पोखरी बाळेश्वर येथील एक महिला पत्र्याच्या शेडमध्ये कुंटणखाना चालवत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून खात्री होताच घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पो ना. राहुल डोके, पो कॉ. राहुल सारबंदे, पोहेकॉ. अनिल कडलग आदींच्या पथकाने छापा टाकला असता एक महिला,
सोमनाथ यादव सरोदे (रा. आनंदवाडी, ता. संगमनेर) व दीपक उत्तम फटांगरे (वय २१, पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) हे संगनमत करून चार तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले.
पथकाने कुंटणखाना चालवण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम व वाहने असा एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहे.
वेश्या व्यवसायातील सहभागी असलेल्या ६ आरोपींना न्यायालयाने १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली असून यामधील एक आरोपी सोमनाथ यादव सरोदे हा पसार झाला आहे.