Post Office : जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल आणि कोणताही धोका न पत्करता चांगले उत्पन्न कमवायचे असेल तर आज आम्ही पोस्ट ऑफिस एक उत्तम स्कीम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये कोणतीही जोखीम न घेता हमी परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना ही देखील यापैकी एक आहे. या योजनेत 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी एकरकमी डिपॉझिट करता येते. यामध्ये पैसे जमा केल्यावर तुम्हाला वार्षिक आधारावर व्याज दिला जातो.

पोस्ट ऑफिसच्या 1 वर्षाच्या टाइम डिपॉझिटवर 6.90 टक्के आणि 2 वर्षांसाठी 7 टक्के व्याजदर आहे. याशिवाय 3 वर्षांच्या ठेवींवर 7 टक्के तर 5 वर्षांच्या ठेवींवर 7.5 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. आता आपण पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर किती फायदा होईल पाहूया.
5 वर्षात किती होईल फायदा ?
पोस्ट ऑफिस टीडी कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये जमा केल्यास, तुमची मॅच्युरिटी रक्कम 7,24,974 रुपये होईल. म्हणजेच व्याजातून 2,24,974 रुपये मिळतील. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम्सच्या ठेव दरांचा सरकारकडून दर तिमाहीत आढावा घेतला जातो. याचा अर्थ व्याज दर प्रत्येक तिमाहीत बदलू शकतात. परंतु, मुदत ठेवींमध्ये, ठेवीच्या वेळी निश्चित केलेले व्याजदर संपूर्ण मुदतीच्या कालावधीसाठी राहतात.
कर लाभ
पोस्टात 5 वर्षांच्या टीडीवर कर सवलतीचा लाभ देखील उपलब्ध आहे. आयकराच्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. लक्षात ठेवा की TD मध्ये मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम करपात्र आहे.
पोस्ट ऑफिस टीडी अंतर्गत एकल खाते आणि संयुक्त खाते देखील उघडले जाते. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 प्रौढांचा समावेश केला जाऊ शकतो. हे खाते किमान 1000 रुपयांमध्ये उघडता येते. यानंतर तुम्ही यामध्ये 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीवर मर्यादा नाही.