MPKV Rahuri Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांनी पदांनुसार आपले अर्ज पाठवावेत. या भरतीसाठी किती जागा भरल्या जाणार आहेत, पाहूया…
वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ट्रॅक्टर मेकॅनिक-सह-ड्रायव्हर, डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन सादर करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 असून, लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे:-
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक :- एम.टेक (फार्म मशिनरी आणि पॉवर इंजिनीअरिंगमधील स्पेशलायझेशनसह कृषी अभियांत्रिकी)
तंत्रज्ञ :- I.T.I. एक वर्षाच्या अनुभवासह मेकॅनिक कृषी यंत्रसामग्री व्यापार किंवा एक वर्षाच्या अनुभवासह फार्म मेकॅनिक.
ट्रॅक्टर मेकॅनिक-सह-ड्रायव्हर :- वैध ट्रॅक्टर ड्रायव्हिंग लायसन्ससह ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेड पासमध्ये ITI.
डेटा एन्ट्री ऑपरेटर :- कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये प्रवीणतेसह पदवी.
या भरतीसाठी वयोमर्यादा देखील आहे. 38 वर्षांपुढील उमेदवारांनी यासाठी अर्ज करू नये, उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी – 413722, जि. अहमदनगर या पत्त्यावर 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवायचे आहेत. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://mpkv.ac.in/ ला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्जासोबत महत्वाच्या कागदपत्राची प्रत जोडणे देखील आवश्यक आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 असून यापुढे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.