Snake Viral News : साप हा पृथ्वीवरच्या अन्नसाखळीचा एक अविभाज्य भाग आहे. पर्यावरणाला त्याची गरज आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सापाचे संवर्धन होणे देखील आवश्यक आहे. अलीकडे सापाच्या अनेक जाती विलुप्त होत चालल्या आहेत. त्यामुळे विलुप्त होत चाललेल्या जातींचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

परंतु साप पाहिल्याबरोबर आपल्या पायाखालची जमीन सरकते. सापाला पाहून आपण खूपच घाबरत असतो. यामुळे अलीकडे साप दिसला की त्याला मारण्याचे प्रकार घडत आहेत.
खरे तर साप हा विषारी प्राणी आहे यात शंकाच नाही. परंतु सर्वच साप विषारी नसतात ही वास्तविकता आहे. आपल्या भारतात फक्त चार जाती अशा आहेत ज्या की खूपच विषारी आहेत.
बाकी साऱ्या जाती बिनविषारी आहेत. यामुळे साप दिसला की, त्यापासून दूर व्हा आणि सर्पमित्राला बोलवून तो साप दूरच्या जंगलात सोडा जेणेकरून सापाचे संवर्धन देखील होईल आणि आपल्या जीवाला देखील धोका होणार नाही. भारतात साप आणि त्याबाबतच्या दंतकथा खूपच प्रसिद्ध आहे.
या दंतकथेमध्ये जर मादा साप मारला तर नर साप बदला घेण्यासाठी येतो ? असे देखील सांगितले जाते. त्यामुळे खरच नागिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नाग येतो का?
असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
काय म्हणतात तज्ञ
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवाचा मेंदू जेवढा विकसित झाला आहे तेवढा सापाचा मेंदू विकसित झालेला नाही.
त्यामुळे साप ढूक धरणे व बदला घेणे ही गोष्ट शक्यच नाही. हे सर्वस्वी अशास्त्रीय आणि भ्रामक कथा आहेत. सापाला फक्त भूक लागली असता भक्ष्य पकडणे, तहान लागल्यावर पाणी पिणे आणि झोपा काढणे एवढेच समजते. या पलिकडे साप कोणताच विचार करू शकत नाही, असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे त्रास देणारी व्यक्ती साप लक्षात ठेवू शकत नाही म्हणजेच साप डूक धरत नाही. यामुळे नागिनीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नाग पुन्हा येतो अशा कथा या निरर्थक असून या फक्त भ्रामक कथा आहेत,
लोकांनी यावर विश्वास ठेवू नये आणि सापांना विनाकारण त्रास देऊ नये. साप हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे यामुळे त्याला मारू नये. त्याचे संवर्धन करावे असे आवाहन तज्ञ लोक करतात.