Ahmednagar News : सालवडगाव (ता. शेवगाव येथे लाळ्या खुरकुत, आजाराने शेतकरी हैराण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये धनंजय टेकाळे (२) गायी, आदिनाथ नवनाथ लांडे (१) गाय, अब्बास शेख (१) गाय, अनिल काकासाहेब भापकर (१) गाय, रेवणनाथ निक्ते (२) गायी, बाबासाहेब लांडे (१) म्हैस, बाबासाहेब निक्ते (१) गाय व इतर एक बैल, अशी एकूण १० जनावरे दगावली आहेत.
सालवडगाव, परिसरातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. गावात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. या ठिकाणी लसीकरण होणे फार गरजेचे होते. ते न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली जात असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांच्यासमोर हे नवीन संकट उभे ठाकले आहे.
दुग्ध व्यवसायात दुधाचे भाव कमी आणि पशुखाद्याचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून, याकडे प्रशासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अश मागणी जोर धरू लागली आहे.
प्रशासन पशुधनावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याचे बोलले जाते. मात्र, ग्रामीण भागात पशुवैद्यकीय विभागाकडून शेतकऱ्यांच्या दुलर्क्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणणे आहे.
सालवडगाव येथे लसीकरण जर झाले असते तर अशाप्रकारे गाई दगावल्या गेल्या नसत्या. माझी देशी गाय लाळ्या खुरकूत आजाराने आठ दिवसांपूर्वी दगावली असून, मला आमच्या गावाला कोण डॉक्टर आहे, हे माहिती नाही. – शेतकरी भिवसेन गिरमकर,
याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता, त्यांनी पाच-सहा जनावरे दगावल्याचे सांगितले; आज शनिवार व उद्या रविवार असून, तुम्ही मला सोमवारी प्रत्यक्ष माझ्या ऑफिसला येऊन भेटा, तुम्हाला प्रत्यक्ष माहिती देतो. –ऋषिकेश खेतमाळीस, पशुवैद्यकीय अधिकारी
आम्ही पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोनद्वारे माहिती दिली. मात्र ते न आल्याने आम्ही आमच्या गायीवर खासगी डॉक्टरांकडून उपचार केले. मात्र, दुर्दैवाने आमची गाय दगावली. आमच्या गावासाठी जे डॉक्टर नेमले आहेत, ते दोन दिवसांपासून येता म्हणतात; परंतु ते आले नाहीत. माझी एक गाय दगावली असून, एक गाय लाळ्या खुरकूत आजाराने बाधित आहे. –शेतकरी, अनिल भापकर