Kopergaon Politics : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत येथे नुकताच संविधान सन्मान व माता रमाई जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ना. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांची अनुपस्थिती होती.
मतदार संघाच्या विकास निधीचा ३ हजार कोटीचा आकडा पार करण्यासाठीच आमदार काळे यांची अनुपस्थिती होती, असे प्रकाश दुशिंग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ६ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर २०१८ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनी स्मारकासमोर होणाऱ्या कार्यक्रमातील माजी आमदार कोल्हेंचे बेगडी प्रेम आंबेडकरी समाजाने पाहिले आहे,
असा हल्लाबोल प्रकाश दुशिंग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. कर्मवीर शंकरराव काळे, माजी आमदार अशोक काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आ. आशुतोष काळे यांनी आंबेडकरी समाजासाठी योगदान दिले आहे.
त्यामुळे आंबेडकरी समाज त्यांच्या पाठीशी आहे. कोणताही समाज मतदानापोटी बांधील नसतो हे कोल्हेंना कधी समजणार ? असा मिश्किल टोला दुशिंग यांनी लगावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होवून देखील कोल्हे बरोबर राहणाऱ्या दीपक गायकवाड यांच्या समाजनिष्ठेविषयी शंका उपस्थित होत असल्याची टीका प्रकाश दुशिंग यांनी केली.