मंत्री आठवलेंच्या कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे यांची दांडी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत येथे नुकताच संविधान सन्मान व माता रमाई जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला ना. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी दांडी मारली. यावरुन रिपाईच्या आठवले गटाचे प्रदेश सचिव दीपक गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका केली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दलित संघटना किंवा नेते यांचे फोटो आणि चेहरे तुम्हाला फक्त मतांसाठी सोबत लागतात का, अशी टीका दीपक गायकवाड यांनी आमदार आशुतोष काळेंवर केली आहे.

तालुक्यात कोणीही मंत्री अथवा मान्यवर आल्यानंतर त्यांच्या स्वागताला स्थानिक आमदारांने हजर राहण्याचा संकेत आहे. तो संकेत आमदार काळे यांनी पाळला नाही.

इतरवेळी शासकीय योजना आणि प्रसिद्धीचे माध्यम मिळाले की, मगच आमदार व त्यांचे कार्यकर्ते यांना दलित संघटना आठवतात. आ. काळे यांनी जाणीवपूर्वक अथांग भीमसैनिक हजर असताना सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून हजर राहणे टाळले आहे का?

ते तर नाहीच पण त्यांच्या मागे इतरवेळी हिंडणारा लवाजमा कुठेही चमकला नाही. आमदार काळे निवडून येण्यात आमच्या दलितांची मतेही होती. हे ते विसरले आहेत का? सामाजाला गृहीत धरून सोयीचे राजकरण करणे, हा प्रकार त्यांना शोभला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe