Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे येथे ‘या’ पदांसाठी भरती सुरु, बघा पात्रता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज सादर करा.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे अंतर्गत “अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 असून, देय तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील सहायक लेखा अधिकारी किंवा त्यावरील वरीष्ठ पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच अर्ज करण्याची वयोमर्यादा ५८ ते ६३ वर्ष इतकी आहे.

अर्ज राज्य सेवा हक्क आयोग, पुणे महसुली विभाग, पुणे यांचे कार्यालय, ३ रा मजला, छत्रपती शिवाजीनगर- घोल रोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे म.न.पा. शिवाजीनगर पुणे – ४११००४. या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, तरी आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज राज्य सेवा हक्क आयोग, पुणे महसुली विभाग, पुणे यांचे कार्यालय, ३ रा मजला, छत्रपती शिवाजीनगर- घोल रोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे म.न.पा. शिवाजीनगर पुणे – ४११००४ या पत्त्यावर 07 मार्च 2024 पर्यंत पोस्टाने पाठवायचे आहेत.

-वरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.