Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्या प्रकरणातील मुख्य आरोपीस जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारे येथून अटक करण्यात आली आहे. तो पळून जायच्या तयारीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती.
अल्पवयीन मुलीस आरोपी विश्वास संतोष मकासरे (वय २०, राहणार संक्रापूर) याने लैंगिक अत्याचार करून तिच्या सोबत बेकायदेशीर विवाह करता यावा, या उद्देशाने सहआरोपींसमवेत पळवुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी एका महिलेसह आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. होमगार्ड रमेश भास्कर मकासरे (वय २६, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी) याने पीडित मुलीस व आरोपीस सुरुवातीला नांदेड येथे व त्यानंतर धुळे जिल्ह्यात पाठवलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीस हवालदार शेळके, नदीम पठाण व तपास पथक पुढील तपासाकामी धुळे जिल्ह्यात सावळी येथे गेले; परंतु आरोपीला त्याची कुणकुण लागल्याने तो धुळे जिल्ह्यातून मेहूनबारे येथे पीडितेसह परागंदा होत असताना पथकाने त्यास ताब्यात घेऊन अटक केली व पीडित मुलीची सुटका करून पोलीस स्टेशन राहुरी येथे आणले.
पीडित मुलीस मानसिक आधार देण्यासाठी तिला तिच्या आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीला दि. १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
पीडितेचे स्टेटमेंट व व वैद्यकीय चाचणीनंतर दाखल गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ तसेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्याचे कलम वाढवण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात,
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, उपनिरीक्षक फडोळ, हवालदार शेळके, नदीम शेख, संतोषकुमार राठोड, ढाकणे, यादव गायकवाड, एएसआय ज्ञानदेव गरजे, हवालदार वैराळ, पोलीस शिपाई बडे, सानप यांच्या पथकाने केलेली आहे.