Maratha Reservation : मराठा समाजाच्या बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद

Ahmednagarlive24 office
Published:

Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्याचे योद्धे मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बंदला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने करण्यात आला आहे.

नगर शहरात सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.

माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी शहर व उपनगरात रॅली काढली.

दुकानदार व व्यावसायिकांना व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले, बंदच्या आवाहनाला समिश्र प्रतिसाद मिळाला, बाजारपेठेतील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला.

माळीवाडा, आशा टॉकिज चौक, माणिक चौक, कापड बाजार, चितळे रोड, दिल्लीगेट मार्गे रॅली काढण्यात आली होती.

रॅलीत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी घोषणाही देण्यात आल्या होत्या.

भिंगार उपनगरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. एकंदरित मराठा समाजाच्या बंदला नगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe