Ahmednagar News Today : नमस्कार वाचकहो आज दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ आज अहमदनगर लाईव्ह २४ वर पब्लिश झालेल्या आणि दिवसभरात चर्चेत राहिलेल्या आणि सर्वात जास्त व्हिझिट्स मिळालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील टॉप दहा बातम्या ह्या पोस्टमध्ये देण्यात आल्या आहेत.
१) डॉ. सुजय विखे स्पष्टच बोलले ! एकदा मला तिकीट मिळू द्या, राम शिंदे आणि निलेश लंके यांचा…
नगर दक्षिणची जागा भाजपाच्या वाटेला जाणार असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र, अजूनही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तथापि या जागेवर पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र सुजय विखे पाटील यांना महाविकास आघाडीमधून…वाचा सविस्तर बातमी
२) अहमदनगरकरांनो यंदा घरपट्टी व पाणीपट्टी वाढणार का? महापालिकेने घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय
महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये यावर्षी वाढ होईल असे अंदाज व्यक्त केले जात होते. यामध्ये वाढ व्हावी याबाबत बऱ्याचदा चर्चाही झाल्या आहेत. परंतु सध्या प्रशासक राज असल्याने यात वाढ होईल असे म्हटले जात होते. परंतु आता यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे…वाचा सविस्तर बातमी
३) कांद्यावरील निर्यातबंदी हटणार नाही ! लागवड 30 टक्क्यांनी घटली
कांद्याचे बाजार मागील अनेक महिन्यांपासून घसरलेले आहेत. ८ डिसेंबरपासून निर्यातबंदी लागू केल्याने हे भाव गडगडले. किरकोळ बाजारात कांद्याचे दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले असल्याने दर नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला गेला होता…वाचा सविस्तर बातमी
४) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, पळून जाण्यास बहिणीसह मेहुण्याचीही मदत
पती पासून अलिप्त राहणार्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. याप्रकरणी पीडितीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अत्याचार करणार्या तरूणासह पळवून जाण्यास…वाचा सविस्तर बातमी
५) मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी त्याच्या सहा साथीदारांसह तलवार घेऊन दरोडा टाकायला आला, पोलिसांनी अचूक ‘गेम’ केला
दरोड्याच्या तयारीत असलेल्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याचे ४ साथीदारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. कोपरगाव तालुक्यातील देर्डे- कोऱ्हाळे शिवार परिसरात दरोड्याच्या तयारीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली…वाचा सविस्तर बातमी
६) नगरसेवक युवराज पठारे हल्ला प्रकरणी तिघे ताब्यात, महत्वाची माहिती समोर…
पारनेर नगरपंचायतीचे महायुतीचे नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना ताब्यात घेण्यास पारनेर पोलिसांना यश आले आहे…वाचा सविस्तर बातमी
७) नगर अर्बन बँक घोटाळा : ‘त्या’ 58 आरोपींची मालमत्ता जप्त होणार, घोटाळ्यातला एक बडा आरोपी फरार
नगर अर्बन बँक घोटाळ्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या या बँक घोटाळ्याची सुनावणी सुरु आहे. माननीय न्यायालयात या घोटाळ्याबाबत सुनावणी सुरू असून यामध्ये सरकारी पक्षांच्या माध्यमातून आणि ठेवीदारांच्या माध्यमातून जोरदार…वाचा सविस्तर बातमी
८) अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार !
जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार आहे. परिणामी, येत्या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळले जाण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 69 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जानेवारी ते जून 2024 मध्ये संपणार आहे…वाचा सविस्तर बातमी
९) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आता शिर्डीतून जाणार
पुणे आणि नाशिक शहरातील नागरिकांच्या माध्यमातून या दोन्ही शहरात दरम्यान रेल्वे मार्ग विकसित झाला पाहिजे अशी मागणी केली जात होती. दरम्यान नाशिक ते पुणे दरम्यान नवीन हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे …वाचा सविस्तर बातमी
१०) आधी सुजय विखे त्यानंतर पुन्हा पितापुत्र दोघेही अमित शहांच्या भेटीला ! विषय कांद्याचा की अहमदनगर लोकसभा तिकिटाचा?
कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी व यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व पुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांनी भेट घेतली. त्याआधी देखील खा. सुजय विखे यांनी अमित शहा यांची याविषयावर…वाचा सविस्तर बातमी