Rain Update 2024 : यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस पडणार आहे. तळी देखील भरतील, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.
येथील स्टेशन रोडवरील मंगल कार्यालयात आयोजित एका समारंभात ते शेतकऱ्यांशी बोलत होते.
यावेळी डख यांनी सांगितले की, अवकाळीचा फटका आपल्याकडे बसणार नाही. तसेच यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस राहील, तळी देखील भरतील. अर्थात राज्यातील धरणे भरतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांमध्ये डख यांच्या विषयी नेहमीच उत्सुकता राहिलेली आहे. मागील वर्षी पुरेशा पावसाअभावी राज्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. नगर जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याने जायकवाडीला पाणी द्यावे लागले.
परिणामी, पिण्यासाठी व शेतीसाठी शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर डख यांच्या अंदाजावर बारागाव नांदूर (ता. राहुरी) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते युसुफ देशमुख यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.