Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! महिन्याला फक्त ‘इतकी’ रक्कम गुंतवून बना करोडपती…

Ahmednagarlive24 office
Published:
Post Office

Post Office : पोस्ट ऑफिस ही देशातील एक अशी संस्था आहे, ज्याद्वारे लाखो लोक त्यांच्या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून करोडो रुपये कमावतात. येथे चालवल्या जाणाऱ्या बचत योजनेचा व्याजदर थेट सरकार ठरवते.

तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीतून कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

येथे तुम्ही दीर्घ काळात मोठा निधी तयार करू शकता, या योजनांची खास गोष्ट म्हणजे तुम्ही येथे अगदी कमी गुंतवणुकीत चांगला फंड जमा करू शकता. या योजनेवर सध्या 7.1 टक्के व्याजदर दिले जात आहेत, तसेच येथे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा देखील लाभ मिळतो. या योजनेत तुम्ही 500 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

जर तुमचे भविष्यात करोडपती होण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करून तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. जर तुम्हाला भविष्यात मोठा निधी हवा असेल तर तुम्ही दरमहा 12,500 रुपये गुंतवून तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

जर तुम्ही ही गुंतवणूक 15 वर्षे सतत करत असाल तर यामध्ये तुमची गुंतवलेली रक्कम 22.50 लाख असेल, तर या फंडाच्या मॅच्युरिटीपर्यंत तुम्हाला 40.68 लाख रुपये मिळतील.

अशातच जर तुम्ही हीच गुंतवणूक 5 वर्षांसाठी दोनदा वाढवली तर 25 वर्षांनी तुमच्याकडे एकूण 1.03 कोटी रुपयांचा निधी जमा होईल. येथे तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 37.05 लाख रुपये असेल आणि व्याजाची रक्कम 65.58 लाख रुपये आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

या योजनेत गुंतवणूकदारांना कर सूट आणि कर्ज सुविधेचा देखील लाभ मिळतो. गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या या रकमेवर 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. यासोबतच, PPF खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेवर तुम्हाला 3 वर्षानंतर कर्जही मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe