Ahmednagar News : जोर्वे गावात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शासकीय वाळुचे उत्खनन करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तालुका पोलिसांनी पकडल्याची घटना काल दुपारी साडेबारा वाजता तालुक्यातील जोर्वे येथे घडली.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील नदीपात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. जोर्वे गावामध्ये वाळूने भरलेला ट्रॅक्टर उभा असल्याची माहिती पोलिसांना समजली.

पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, जोर्वे गावात माध्यमिक शाळेच्या कंपाउंड जवळील रोडवर वाळुने भरलेला ट्रॅक्टर उभा असल्याचे निदर्शनास आले. या ट्रॅक्टरमध्ये शासकीय वाळुचे उत्खनन केलेली वाळू भरलेली होती.

पोलिसांनी पंचनामा करून १ लाख ५० हजार रुपये किंमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. १७ ए.व्ही ७०६५), ५५ हजार रुपये किमतीची विना नंबरची ट्रॉली, तिच्या मध्ये असलेली १५ हजार रुपये किंमतीची दीड ब्रास वाळु,

असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत पोलीस नाईक बाबासाहेब शिरसाठ यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उगले हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe