Fixed Deposit : ICICI बँकेच्या ग्राहकांनो लक्ष द्या…! एफडीवर मिळत आहे बक्कळ व्याज…

Published on -

Fixed Deposit Interest Rate : प्रत्येकाला भविष्यासाठी गुंतवणूक करायची असते. अशा परिस्थितीत लोक कमी जोखीम आणि जास्त परतावा असलेले पर्याय शोधतात. कारण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाबाबत कोणालाही जोखीम घ्यायची नसते, अशातच तुम्हीही गुंतवणुकीसाठी अशाच पर्यायाच्या शोधत असाल, तर तुम्हाला FD म्हणजेच मुदत ठेवीपेक्षा चांगला पर्याय सापडणार नाही.

FD ही अशी गुंतवणूक आहे जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात, यासोबतच सध्या अशा अनेक बँका आहेत ज्या एफडीवर जास्त व्याज देत आहेत. अलीकडे देशातील अनेक बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केले आहेत. त्याच वेळी, आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँक ICICI बँकेने FD दर बदलले आहेत.

बँकेचे नवीन व्याजदर 17 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू होतील. बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.

ICICI बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, बँकेत देशांतर्गत एफडी उघडण्यासाठी किमान 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. चला बँकेच्या व्याजदरांवर एक नजर टाकूया…

सामान्य नागरिकांसाठी किती व्याज ?

1- बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 3 टक्के व्याज देते.

2- 30 ते 45 दिवसांच्या FD वर बँक 3.50 टक्के व्याज देत आहे.

3- बँक 46 दिवस ते 60 दिवसांच्या FD वर 4.25 टक्के व्याज देत आहे.

4- बँक 61 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के व्याज देत आहे.

5- बँक 91 दिवस ते 184 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के व्याज देत आहे.

6- 185 दिवस ते 270 दिवसांच्या FD वर बँक 5.75 टक्के व्याज देत आहे.

7- 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या 271 दिवसांच्या FD वर बँक 6 टक्के व्याज देत आहे.

8- बँक 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.70 टक्के व्याज देत आहे.

9- 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर बँक 7.20 टक्के व्याज देत आहे.

10- बँक देत आहे – 2 वर्ष, 1 दिवस ते 5 वर्षांच्या FD वर 7 टक्के.

बँक ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज देत आहे. बँक 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe