Chandra Grahan 2024 : मार्चमध्ये वर्षातील पहिले चंद्रग्रहण, ‘या’ राशींवर दिसून येईल परिणाम !

Ahmednagarlive24 office
Published:
Chandra Grahan 2024

Chandra Grahan 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला ग्रहांप्रमाणेच मोठे महत्त्व मानले जाते. जेव्हा जेव्हा ग्रहण होते तेव्हा ती घटना खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक मानली जाते, जी पृथ्वीपासून मानवी जीवनापर्यंत प्रत्येकाला प्रभावित करते.

2023 प्रमाणेच 2024 मध्येही चार ग्रहण होणार आहेत, त्यापैकी 25 मार्चला होळीनंतर वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. भारतात ते दिसणार नाही तसेच सुतक कालावधी देखील वैध ठरणार नाही. विशेष म्हणजे 100 वर्षांनंतर पहिल्यांदाच होळीला चंद्रग्रहण होत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षातील पहिले ग्रहण चंद्रग्रहण असेल, जे 25 मार्च 2024 रोजी होणार आहे. हे ग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण असेल, अशा स्थितीत त्याचा सुतक कालावधी देखील वैध राहणार नाही. हे चंद्रग्रहण 04 तास 36 मिनिटे चालेल.

चंद्रग्रहणाची वेळ सकाळी 10.24 ते दुपारी 03.01 पर्यंत आहे. दरम्यान, या चनद्रग्रहणाचा काही राशींवर प्रभाव पडणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना या काळात कोणती काळजी घ्यावी लागेल जाणून घेऊया…

हे ग्रहण मेष, कर्क, वृषभ, कन्या आणि सिंह राशीसाठी खूप शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकते. प्रगतीच्या नवीन संधी खुल्या होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांनाही विशेष परिणाम मिळतील, ते आर्थिक लाभासह नवीन करार अंतिम करू शकतात.

ग्रहण काळात कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे?

-शास्त्रज्ञांच्या मते, चुकूनही ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. सुतक काळात देवी-देवतांची पूजा करू नये.

-ग्रहणकाळात अन्न किंवा पाण्याचे सेवन करू नये आणि अन्न व पेयांमध्ये तुळशीची पाने टाकावीत.

-ग्रहणकाळात केस व नखे कापू नयेत.गर्भवती महिलांनी तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळावे.

-ग्रहणकाळात लोकांनी मंत्र आणि स्तोत्रांचा जप करावा. नोकरीत प्रगतीसाठी सूर्यग्रहणानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाचे ध्यान करून गहू, गूळ, लाल वस्त्र, तांबे इत्यादी दान करावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe