Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात हातात नंग्या तलवारी घेऊन गुंडांचा हैदोस, तरुणावर वार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी शहरात गुंडांची दहशत पाहायला मिळाली. शहरात गर्दीच्या ठिकाणी तीन गुंडांनी हातात नंग्या तलवारी घेऊन हौदोस घातला.

गुंडांनी तरूणाचा पाठलाग करत त्याच्यावर तलवारीने वार केले. पैसे व मोबाईल काढून देण्याची मागणी करत या गुंडांनी दहशत निर्माण केली.

याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तीन गुंडांना अटक केली आहे. सुदर्शन शशिकांत वाणी असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. निखिल महादेव सोनवणे, आर्यन राजकुमार पाटील, प्रदीप सुनील सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत.

शिर्डी शहरात सोमवारी सायंकाळी ६ वाजता शिवजयंती बघण्यासाठी आलेला साकुरी येथील सुदर्शन शशिकांत वाणी हा तरुण घरी जात असताना निखिल महादेव सोनवणे, आर्यन राजकुमार पाटील,

प्रदीप सुनील सोनवणे या तिघांनी वाणी यास पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. फिरायला का आला असे म्हणत पैसे व मोबाईल काढून दे अशी मागणी केली.

विरोध केला तर तलवारीने मारून टाकू, अशी धमकी देत तलवार व चॉपर काढत डोक्यावर, हातावर,

पार्श्वभागावर, कमरेवर वार करून जखमी केले. जखमी झालेला वाणी जीव वाचवण्यासाठी पळत असताना या तिघांनी त्याचा पाठलाग केला.

शिर्डीत खून तसेच चाकू हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच शहरात सोमवारी तलवारीचा हल्ला झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी भा.दं.वी कलम् ३२७, ३२०, ५४, ३४ व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, सतीश पगारे, पोलीस कर्मचारी पवार, बाबासाहेब खेडकर, राजेंद्र बिरदवडे यांनी या तीन गुंडांना पाठलाग करून अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe