महानंदचे अध्यक्ष परजणेंचा राजीनामा, राज्याचे वैभव असलेली महानंद डेअरी…

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे नुकतेच सुपूर्द केल्याची माहिती महानंदा दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याबाबत दिलेल्या पत्रकात परजणे यांनी सांगितले की, महानंद ही महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था मानली जाते.

गेल्या अनेक दिवसांपासून महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्यावरून राजकारण तापलं होतं. मुंबई (महानंदा) या दुग्धव्यवसायातील व सहकारातील शिखर संस्थेच्या संचालक मंडळाची १३ वी बैठक २० फेब्रुवारी २०२४ रोजी एन. के. एम. कार्यालय, चर्चगेट, मुंबई येथे आयोजित केली होती. महानंदची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती असल्याने तिचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.

मंगळवारी महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांचे हितसंवर्धन होण्याच्या दृष्टीकोनात दूध महासंघाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरण करण्याचे नियोजित आहे.

बैठकीत महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, आ. माणिकराव कोकाटे व इतर १५ असे एकूण १७ संचालकांनी संचालक पदाचे राजीनामे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक कान्हुराज बगाटे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

पुरेसे दूध संकलन आणि वितरणा अभावी आर्थिक अडचणींच्या खोल गर्तेत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई म्हणजेच महानंदच्या संचालक मंडळाने महानंद राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला (एनडीडीबीला) चालविण्यासाठी द्यावे, असा ठराव करून सरकारला पाठविला आहे.

त्यामुळे केवळ कार्यक्षम कारभाराच्या अभावामुळे एकेकाळी राज्याचे वैभव असलेली महानंद डेअरी एनडीडीबीच्या घशात जाणार, हे स्पष्ट झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe