Maharashtra Politics : अजितदादांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार – रोहित पवार

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra Politics : अजितदादांची भाजपमध्ये वट आहे असे वाटत होते, पण तशी स्थिती राहिलेली नाही. त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून त्यांची वट राहिली नाही.

त्यांचा दिल्लीतील संपर्क कमी पडत असून विधानसभेला वीस जागा मिळतील किंवा तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढा, असे सांगितले जाईल, अशी बोचरी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

पिंपरीत पक्ष कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, रविकांत वर्षे, माधव पाटील, देवेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

रोहित पवार पुढे म्हणाले, लोकसभेला भाजपला दोन्ही पक्षांची गरज आहे. पण अजितदादा व एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी केले जात आहे. त्यामुळे लोकसभेनंतर त्यांची किंमत काय होईल ते सांगता येत नाही.

लढायचे असेल, तर वेगवेगळे लढा अशी परिस्थिती होणार आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत काहीही होऊ शकते. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार होती, असे कळले. पण तसे न झाल्यामुळे लोकसभेला ते उभे राहतील.

शिरूरमध्ये शक्यता कमी आहे. परंतु बारामती किंवा नगर येथून त्यांना उमेदवारी मिळू शकते, असेही रोहित पवार म्हणाले. तसेच अनिल तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा वाद आजचा नाही. अनिल तटकरे हे आमच्या संपर्कात होते आणि आजही आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe