29 February Sanyog : 29 फेब्रुवारी दर 4 वर्षांनी येतो. यावेळी २९ फेब्रुवारीला गुरुवारी येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस खूप शुभ मानला जात आहे. या काळात ग्रहांचा विशेष संयोग होणार आहे. कुंभ राशीत सूर्य, बुध आणि शनि या तीन ग्रहांचा संयोग होईल.
तसेच या काळात राहु मीन राशीत आहे आणि केतू कन्या राशीत आहे. तर मंगळ आणि शुक्राचा संयोगही तयार होत आहे. तसेच चंद्र तूळ राशीत भ्रमण करेल. शुक्र मकर राशीत असेल. ग्रह आणि नक्षत्रांचा असा संयोग 29 फेब्रुवारीला आणखी खास बनवत आहे. अशातच या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल.
गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि गुरू ग्रहाला समर्पित आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिनाही गुरुवारी सुरू झाला. गुरुवारी काही उपाय करणे शुभ मानले जाते. कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होते, यासोबतच विश्वाचे पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. बृहस्पति हा भाग्य, संतती, विवाह आणि धार्मिक कार्याचा कारक मानला जातो.
-या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. पिवळ्या मिठाई, पिवळी फळे, हरभरा डाळ आणि पिवळे कपडे गरजूंना दान करता येतील.
-या दिवशी सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. यानंतर भगवान विष्णूची पूजा करा. तुपाचा दिवा लावा. नारायणाच्या मंत्रांचा जप करा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.
-“ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा जप हातात 7 तुळशीच्या पानांसह करा. त्यानंतर भगवान विष्णूच्या चरणी तुळशीची पाने अर्पण करा. असे केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात.
-गुरुवारी सहस्त्रनाम पठण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने प्रगतीची शक्यता आहे.
या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला. केळीच्या झाडाची पूजा करा. केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि जल अर्पण करा. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते.