राहुरी तालूक्यातील टाकळीमियाँ येथील अविनाश रमेश कवाणे या २३ वर्षीय अविवाहित तरुणाने त्याच्या घराशेजारील कांद्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अविनाश रमेश कवाणे (वय २३) हा अविवाहित तरुण राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील कारखाना रस्ता परिसरात त्याच्या कुटुंबासह राहतो.
काल सकाळी अविनाश नेहमीप्रमाणेच सकाळी उठला. आपला नित्यक्रम आवरल्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याने घराशेजारी कांद्याच्या शेडमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
त्याच्या नातेवाईकांनी अविनाशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. परिसरातील काही जणांनी अविनाशला ताबडतोब खाली उतरवले.
रवींद्र देवगीरे यांनी त्यांच्या रुग्णवाहीकेतून त्याला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अविनाशला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले.