Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाअंतर्गत भरती सुरु, या पत्त्यावर पाठवा अर्ज !

Published on -

Rajya Lokseva Hakka Aayog Pune : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे अंतर्गत सध्या विविध जागेसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, उमेदवर दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात.

वरील पदांसाठी “अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज पाठवावेत.

वरील पदासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील सहायक लेखा अधिकारी किंवा त्यावरील वरीष्ठ पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच यासाठी वयोमर्यादा ५८ ते ६३ वर्ष आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन अर्ज राज्य सेवा हक्क आयोग, पुणे महसुली विभाग, पुणे यांचे कार्यालय, ३ रा मजला, छत्रपती शिवाजीनगर- घोल रोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे म.न.पा. शिवाजीनगर पुणे – ४११००४. या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

तसेच अर्ज 07 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, तसेच अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. उमेदवारांनी अर्ज 07 मार्च 2024 पर्यंत सादर करायचा आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News