Ahmednagar News : आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक रात्री घरी जात असताना तोंड बांधलेल्या पाच तरुणांनी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून हल्ला करून बेदम मारल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नयन गोंविंद शिंदे (वय २१, रा. दत्तनगर), विकी किशोर शिंदे (वय १९, गजानन नगर), आकाश सखाराम मकोने (वय २३, दत्तनगर),
भारत भाऊसाहेब आव्हाड (वय १९, निंभारा मैदान), अतुल देविदास आव्हाड (वय १९, गजानन नगर) या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आहे.
त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. बिडवे यांच्या कटिंगच्या दुकानासमोर, शनीचौक,
गांधीनगर, कोपरगाव येथे गुरूवारी (दि. २२) रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास सहा ते सात अनोळखी इसमांनी एकत्रित येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून काहीएक कारण नसताना फिर्यादीस लोखंडी रॉडने, विटांनी व लाथाबुक्यांनी माराहाण करुन दुखापत केली आहे.
या घटनेप्रकरणी अशिष मिनानाथ आग्रे (वय २७) यांनी कोपरगाव शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव येथील आरोपीसह पाच इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहेत. आग्रे यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.