Petrol Diesel Prices : देशात दररोज सकाळी पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात येत असतात. आजही पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहीर करण्यात आले आहेत.
जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमतीमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. कच्चा तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने चढ उतार होत आहे.

आजही कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत. तेलाची किंमत 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली पोहोचली आहे. WTI क्रूड 2.70% घसरून प्रति बॅरल 76.49 वर आहे. ब्रेंट क्रूड 2.45% घसरून प्रति बॅरल 81.62 डॉलरवर आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवीन दर जाहीर करण्यात आले असले तरी त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कच्चा तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाली आली देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले नाहीत.
देशातील मुख्य राज्यातील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर
देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. दिल्लीत प्रति लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 89.62 रुपये आहे. महाराष्ट्रात मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा प्रति लिटर 94.27 रुपये आहे.
भोपाळमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 108.65 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 93.90 रुपयांना विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.03 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 92.76 रुपये आहे.
घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे नवीन दर
तुम्हालाही घरबसल्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या फोनवरून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल दर एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 या क्रमांकावर पाठवा.
तसेच HPCL ग्राहक 922201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घेऊ शकतात.