Samsung Galaxy S23 Offer : सॅमसंग स्मार्टफोन कंपनीकडून त्यांचे स्वस्त आणि महागडे स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यांच्या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅमसंगकडून त्यांच्या सर्वोत्तम स्मार्टफोनवर बंपर ऑफर देण्यात येत आहे.
तुम्हालाही सॅमसंगचा Galaxy S23 हा स्मार्टफोन खरेदी करायचा असे तर त्वरित करा. कारण कंपनीकडून त्यांच्या Galaxy S23 स्मार्टफोनवर या महिन्यात मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे Galaxy S23 स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकता.
सॅमसंग Galaxy S23 स्मार्टफोनवर Amazon कडून 28 टक्के सूट दिली जात आहे. Galaxy S23 128GB मॉडेलची किंमत 89999 रुपये आहे मात्र हा स्मार्टफोन तुम्ही 64999 रुपयांमध्ये अगदी सहज खरेदी करू शकता.
एक्सचेंज ऑफर
सॅमसंग Galaxy S23 स्मार्टफोन खरेदीवर Amazon कडून एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. Amazon ई- कॉमर्स कंपनीकडून जुन्या फोनवर 27000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तो एक्सचेंज करून तुम्ही 27000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता.
मात्र ही सूट तुमच्या स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून आहे. तुम्हाला एक्सचेंज ऑफर जाणून घेण्यासाठी Amazon वर तुमचा पिन कोड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑफरबद्दल सर्व माहिती येईल.
बँक ऑफर
सॅमसंग Galaxy S23 स्मार्टफोन बँक ऑफर देखील देण्यात येत आहे. तुम्ही याचा लाभ घेऊन आणखी स्वस्त हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. HDFC बँक क्रेडिट कार्डने Galaxy S23 स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला 5000 रुपयांची झटपट सूट देखील देण्यात येत आहे.
Samsung Galaxy S23 तपशील
Samsung स्मार्टफोन न निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या Galaxy S23 स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 2 CPU प्रोसेसर देण्यात आला आहे.
स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50 MP आणि 12 MP कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 3,900 mAh बॅटरी देण्यात आली आहे.