सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जाहीर, पहा…

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने उद्यापासून अर्थातच 25 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहे. खरे तर आधीच रब्बी हंगामातील पिकांना अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे.

अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार हे स्पष्ट होत आहे. दरम्यान आता आपण हवामान खात्याचा सविस्तर अंदाज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतीय हवामान विभागाचा नवीन अंदाज

आयएमडी ने उद्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD म्हणतंय की, मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून मंगळवार पर्यंत पावसाची शक्यता आहे.

तसेच नांदेड जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या गव्हाच्या पिकाला या जोरदार वाऱ्यांचा फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.

तसेच परभणी जिल्ह्यात उद्यापासून मंगळवार पर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात रविवारी आणि मंगळवारी पावसाची हजेरी लागू शकते असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

धाराशिव जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर या जिल्ह्यात मंगळवारी ढगांच्या गडगडाटास काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या सर्वच्या सर्व म्हणजे 11 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून मंगळवार पर्यंत अर्थातच तीन दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भात सुद्धा वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe