Credit Card Tips : आजकाल अनेकजण ऑनलाईन खरेदी किंवा स्टोअरमध्ये जाऊन शॉपिंग करत असतात. शॉपिंग करताना अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. शॉपिंग करताना अनेकांना क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर काही कॅशबॅक देखील मिळत असतो.
तुम्हालाही तुमच्या क्रेडिट कार्डवर सर्वाधिक कॅशबॅक हवा असेल तर तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. या टिप्स फॉलो करून तुम्ही चांगला कॅशबॅक मिळवू शकता.
कोणत्याही ठिकाणी बिल करत असताना जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्हाला अनेक प्रकारची सूट देखील दिली जात असते.
क्रेडिट कार्डवर अधिक कॅशबॅक मिळवण्यासाठी खालील टिप्स वापरा
योग्य क्रेडिट कार्ड निवडा
तुम्ही क्रेडिट कार्ड खरेदी करताना योग्य बँकेचे क्रेडिट कार्ड निवडावे. क्रेडिट कार्ड पैशांची गरज पूर्ण करत असतात. मात्र त्याचे बिल देखील वेळेतच भरावे लागते. तुम्ही क्रेडिट कार्ड कुठे वापरत आहेत यावर तुमच्या क्रेडिट कार्डवर मिळणार कॅशबॅक ठरत असतो.
दैनंदिन खर्चावर आधारित कार्ड निवडा
जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड नियमित वापरत असाल तर तुम्हाला अधिक कॅशबॅक मिळू शकतो. दैनंदिन क्रेडिट कार्ड वापरत असाल तर योग्य प्रकारचे क्रेडिट कार्ड निवडणे आवश्यक आहे.
बिल पेमेंट आणि ई-शॉपिंग करताना
अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाइन रिटेलर्स किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरच वापरत असतात. या ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही सर्वाधिक कॅशबॅक मिळवू शकता. ऑनलाइन रिटेलर्स किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून तुम्हाला क्रेडिट कार्ड पेमेंटवर अधिक कॅशबॅक दिले जातात.
प्रवास आणि लॉयल्टी ऑफर
तुम्ही फ्लाइट, हॉटेल आणि कार तिकीट पेमेंटसाठी क्रेडिट कार्डचा वापर करून अधिक कॅशबॅक मिळवू शकता. फ्लाइट, हॉटेल आणि कार तिकीटवर सतत क्रेडिट कार्ड पेमेंटच्या ऑफर असतात. तुम्ही या ठिकाणी क्रेडिट कार्ड वापरून पैशांची बचत देखील करू शकता.