आज आकाशात काळे कावळेसुद्धा दिसले नाहीत; संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका

मुंबई/प्रतिनिधी सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीचे कार्य करत आहे. कोरोनाशी खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र लढत आहे.

परंतु कोरोना व्हायरसशी लढण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करत भाजप महाराष्ट्र बचाव आंदोलन करत आहे. संजय राऊत यांनी यावर बोचरी टीका करत म्हटले आहे की ” भाजपचे हे आंदोलन पूर्णत: फसलेलं आहे.

हे फक्त भाजप नेत्यांचं आंदोलन होतं. जनता यात सामील झाली नाही. मला तर आज आकाशात काळे कावळेसुद्धा दिसले नाहीत.”

मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हलवल्यानंतर लाखो लोक बेरोजगार होतील. त्यामुळे खरेतर भाजपने त्यावेळी काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला पाहिजे होते,’ असा टोलाही  संजय राऊत यांनी लगावला आहे.

भाजपचं आंदोलन म्हणजे डोमकावळ्याची फडफड, अशी टीका सामनामधून करण्यात आली होती. सामनाच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. ‘

दुसऱ्याच्या घरात रोज डोकावणाऱ्या पत्रपंडितांनी भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले नसते तर आम्हालाच चुकल्यासारखे वाटले असते.

आम्ही डोमकावळे तर तुम्ही कोण? लबाड लांडगे? सत्तेची फळं खायची,त्याच झाडाची मुळं खणायची! त्यांची अशीच गत व्हायची! आता बोलून नाही, महाराष्ट्रात करुन दाखवा!’,

असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं होतं.   आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. आंदोलन अपयशी ठरल्यामुळे त्यांचा जळफळाट झाल्याने ते टीका करत असल्याचं संजय राऊत म्हणाले.