Ahmednagar News : नगरमध्ये चाललंय काय ? आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरूणावर कोयता, कुन्हाडीने हल्ला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरात मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना घडताना समोर आल्या आहेत. मारहाण, खून आदी प्रकरणे देखील वाढीस लागली आहेत.

मारहाणीच्या घटना ताजा असतानाच आता आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरूणावर कोयता, कुन्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

ही हल्ला करण्याची घटना बुधवारी (दि. २१) रात्री साडेआठच्या सुमारास नागापूरच्या पितळे कॉलनीत घडली.

हल्ला झालेल्या तरूणाचे नाव देवेंद्र भगवान शर्मा (रा. कातोरे वस्ती, बोल्हेगाव) असे असून जातो जखमी असून त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुरूवारी (दि. २२) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रवी अंकुश आंधळे, संतोष अंकुश आंधळे (दोघे रा. जिरेवाडी ता. पाथर्डी) व तीन अनोळखी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास देवेंद्र शर्मा हे नागापूरच्या पितळे कॉलनीत असताना रवी आंधळे, संतोष आंधळे व इतर तिघे तेथे आले.

त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाले. पाच जणांनी मिळून शर्मा यांच्यावर कोयता, कुन्हाडीने जीवघेणा हल्ला केला. जखमी शर्मा यांच्या पत्नीला घटनेची माहिती मिळताच त्या घटनास्थळी आल्या.

त्यांनी शर्मा यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोढे करीत आहेत.

नगर शहरात सुरु असणाऱ्या या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून या गुन्हेगारीचा बिमोड पोलिसांनी करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe