Mercury Transit 2024 : बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध हा ज्ञान, व्यवसाय, बुद्धिमत्ता, शांती, संपत्ती, न्याय आणि शिक्षणाचा कारक मानला जातो. बुध 7 मार्च रोजी गुरूच्या राशीत मीन मध्ये प्रवेश करणार आहे. या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम होणार आहे.
काही राशींना बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे खूप फायदा होईल. या काळात प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. बिघडलेली कामे मार्गी लागतील, कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांचा बुधाचा आशीर्वाद मिळणार आहे, पाहूया….
वृषभ
बुधाचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जात आहे. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढेल आणि चित्रपट उद्योग आणि मीडियाशी संबंधित लोकांना फायदा होईल. व्यावसायिकांसाठी हे संक्रमण शुभ राहील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे लोक नफा कमवू शकतात. मेहनतीचे कौतुक होईल.
मिथुन
बुधाचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. तुमचे संवाद आणि व्यावसायिक कौशल्ये सुधारतील. आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमणही उत्तम राहील. पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. बुधवारी गाईला चारा खाऊ घालणे शुभ राहील.
मीन
मीन राशीच्या लोकांवर बुध ग्रहाची विशेष कृपा असेल. या राशीत ग्रहांचे राजकुमार बसतील. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. उत्पन्न वाढेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुद्धाचे संक्रमण देखील शुभ राहील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल. व्यवसायात लाभ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. बराच काळ अडकलेला पैसा परत येईल. कुटुंबात सुख-शांती राहील.