Reliance Jio New Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे करोडो ग्राहक आहेत. कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जात आहेत. दरम्यान रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे कंपनीने एक मोठा निर्णय घेतला असून कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी काही निवडक प्लॅनवर अतिरिक्त डेटा देण्याची घोषणा केली आहे.
याबाबतची माहिती कंपनीने नुकतीच सार्वजनिक केली असून यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता जिओच्या ग्राहकांना 399 रुपयांच्या प्लॅन सोबत आणि 119 रुपयांच्या प्लॅन सोबत अतिरिक्त डेटा मिळणार आहे.
यामुळे या प्लॅनने रिचार्ज करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांना अतिरिक्त डेटाचा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या दोन्ही प्लॅनची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जिओचा ३९९ रुपयांचा प्लॅन : या रिचार्ज प्लॅन अंतर्गत, जिओ वापरकर्त्यांना 6 जीबी अतिरिक्त डेटाचा लाभ दिला जात आहे. 28 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3 GB डेटा आणला जातो, जो एकूण 90 GB आहे.
यामध्ये दररोज अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जीओ क्लाउड यांचे मोफत सबस्क्रिप्शन देखील यासोबत उपलब्ध आहे.
219 चा प्लॅन : रिलायन्स जिओ कंपनीचा हा एक प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जात आहे.
यामध्ये ग्राहकांना 42 जीबी डेटा चा लाभ मिळू शकणार आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दिवसाला 100 एसएमएस उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर ज्या लोकांकडे 5G सिम आहे त्यांना अमर्यादित डेटा लाभ दिला जात आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे फायदे हँडसेट आहे त्यांना अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. मात्र ही सर्व्हिस जिथे 5G आहे तिथेच लागू राहणार आहे.