PM Kisan Update : केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून नवनवीन योजना सादर केल्या जात आहेत.
केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. यामधून शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जात आहेत. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हफ्त्यांमध्ये वर्ग केले जातात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच आहे. अल्पभूधारक शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 15 हप्ते देण्यात आले आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांना 16 व्या हफ्त्याचे पैसे दिले जाणार आहेत.
28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत. नरेंद्र मोदी यादिवशी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस शेतकऱ्यांना 16 व्या हफ्त्याचे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे.
ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते आधारशी लिंक केले आहे त्याच शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा हफ्ता मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी KYC आणि बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार नाही.
दर 4 महिन्यांनी पैसे जमा केले जातात
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपयांचा एक हफ्ता बँक खात्यात जमा केला जातो. समान तीन हफ्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
eKYC कसे करावे?
पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्हीही खालील पद्धतीने e-KYC करू शकता.
सर्वात प्रथम तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर फार्मर कॉर्नर अंतर्गत ‘ई-केवायसी’ पर्यायावर क्लिक करा.
त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि मोबाईलवर आलेला ओटीपी भरा.
तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन देखील तुम्ही e-KYC करू शकता.