क्रिकेट प्रेमींची निराशा ; ट्वेन्टी-२० स्पर्धा लांबणीवर?

Ahmednagarlive24
Published:

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टी बंद ठेवण्यात आले आहेत. यातून क्रीडा क्षेत्रही वगळले गेले नाही.

सध्या सर्वच सामने बंद आहेत. आता ऑस्ट्रेलियात रंगणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून पुढील आठवडय़ापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याविषयी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान पुरुषांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा सातवा हंगाम खेळवण्यात येणार आहे;

परंतु करोनाच्या संसर्गामुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विश्वचषकाबाबतीतही लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

परंतु विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यास ‘आयसीसी’ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियापुढे तीन पर्याय उपलब्ध असून त्यांपैकी ते कोणता पर्याय निवडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment