आनंदाचा शिधा भाजपचा की सरकारचा ? भाजपच्या फ्लेक्सवर फेकली शाई !

Maharashtra News

Maharashtra News : आनंदाचा शिधा वाटपप्रसंगी लावलेल्या भाजपच्या फ्लेक्स बोर्डवर आक्षेप घेत, शाही फेकून निषेध करण्यात आला आहे. तालुक्याच्या पठार भागातील घारगाव-बोरबन विविध कार्यकारी सोसायटीसमोर सोमवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता हा प्रकार घडला.

हा भाजपचा उघड-उघड प्रचार असल्याचा आरोप बोरबनचे माजी सरपंच ज्ञानदेव सखाराम गडगे यांनी करत आनंदाचा शिधा भाजपचा की सरकारचा याचा शासकीय अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांचे फोटो असलेला हा फ्लेक्सबोर्ड आहे.

तर खाली भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा असे लिहिलेला मजकूर आहे. यावर गडगे यांनी आक्षेप घेतला. बोरबन गाव मुळातच अकोले विधानसभा मतदार संघाला जोडलेले आहे.

बोर्डवर खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार बाळासाहेब थोरात यांचा फोटो का नाही? असाही सवाल ज्ञानदेव गडगे यांनी उपस्थित केला. हा बोर्ड रविवारी मध्यरात्रीतून लावण्यात आला आहे. सोसायटीचे चेअरमन व सचिवांना बोर्ड संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe