OnePlus Watch 2 : OnePlus ने लॉन्च केले जबरदस्त स्मार्टवॉच ! एकदा चार्ज केल्यावर चालणार 100 तास, किंमत फक्त

Ahmednagarlive24 office
Published:
OnePlus Watch 2

OnePlus Watch 2 : वनप्लस स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे दुसरे स्मार्टवॉच लॉन्च करण्यात आले आहे. स्मार्टफोननंतर आता कंपनीकडून वॉच लॉन्च करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. वनप्लसकडून त्यांचे अनेक महागडे स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत.

OnePlus च्या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून OnePlus Watch 2 घड्याळ लॉन्च केले आहे. OnePlus ने 2021 मध्ये त्यांचे पहिले घड्याळ भारतात लॉन्च केले होते. नवीन स्मार्टवॉचमध्ये कंपनीकडून मजबूत बॅटरी आणि उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

4 मार्चपासून OnePlus Watch 2 Amazon, Flipkart, Reliance, Chroma आणि OnePlus Experience Store वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. OnePlus कडून त्यांच्या नवीन स्मार्टवॉचवर 2000 रुपयांची झटपट देण्यात येईल मात्र तुम्हाला ICICI बँक वन कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल.

OnePlus Watch 2 डिझाईन आणि किंमत

OnePlus Watch 2 स्मार्टवॉचचे डिझाईन 2.5D सॅफायर क्रिस्टल कव्हरसह देण्यात आले आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी याला IP68 रेटिंग देण्यात आले आहे. या स्मार्टवॉचची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टवॉचचे वजन 49g आहे.

स्मार्टवॉचला 1.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टवॉच क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन W5 SoC वर BES 2700 MCU चिपसेटसह काम करते. या स्मार्टवॉचमध्ये Google ॲप्स देखील सहज चालवता येऊ शकतात.

OnePlus चे Watch 2 Google च्या WearOS 4 वर काम करते. 2 GB RAM आणि 32 GB स्टोरेज पर्यायासह OnePlus Watch 2 लाँच करण्यात आले आहे. हे वॉच ॲपल वॉचशी स्पर्धा करेल.

स्मार्टवॉचमध्ये शक्तिशाली बॅटरी

OnePlus कडून त्यांच्या Watch 2 मध्ये 500mAh बॅटरी पर्याय देण्यात आला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही 100 तास हे वॉच चालवू शकता. 60 मिनिटांत या वॉचची बॅटरी चार्ज होईल. 7.5W VOOC फास्ट चार्जर देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe