संदीप वराळ खून प्रकरण लवकर निकाली काढा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ खून प्रकरणाचा निकाल लवकर लावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.याप्रकरणी या खटल्यातील आरोपी बबन कवाद याने सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती.

यातील आरोपी कवाद जामिनावर बाहेर असून, अ. नगर व पुणे जिल्ह्यात वराळ खून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत प्रवेश करण्यास त्याला मनाई केलेली आहे. वराळ खून प्रकरणास सात वर्षे उलटूनही निकाली लागत नाही.

म्हणून आरोपी कवाद याने त्याच्यावरील दोन जिल्ह्यातील प्रवेश बंदीची अट शिथिल करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती; परंतु प्रवेश बंदी शिथिल करण्यासाठी दिलेले कारण योग्य वाटत नाही,

असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या मागणीस नकार दिला. या घटनेला अनेक वर्षे उलटूनही खटला निकाली निघत नाही म्हणून न्यायालयाने नाराजी व्यक्त करत

या प्रकरणाची दखल घेऊन हा खटला लवकरात लवकर निकाली काढावा, असे निर्देश अहमदनगर सत्र न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणाची सुनावनी न्यायमूर्ती अनिवृध्द बोस व न्यायमूर्त संजय कुमार यांच्या न्याय पिठासमोर झाली. याचिकाकर्ता बबन कवाद यांची बाजू अॅड. प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे व पुलकित अग्रवाल यांनी मांडली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe