Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, वाचा…

Updated on -

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही सध्या कार घेण्याचा विचार करत असाल तर बँक तुम्हाला सध्या स्वस्त दरात कर्ज ऑफर आहे.

बँक तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑफर घेऊन आली आहे. बँक ऑफ बडोदाने नुकतीच कार कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. सोमवारी बँकेने कार कर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. बँकेचे नवीन दर 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.

बँक ऑफ बडोदाने कार कर्जाचे दर 0.65 टक्क्यांनी कमी केले आणि आता दर 9.4 टक्क्यांवरून 8.75 टक्क्यांवर आले आहेत. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. तुम्ही ३१ मार्चपर्यंत स्वस्त कार कर्जाचा लाभ घेऊ शकता. या ऑफरअंतर्गत प्रक्रिया शुल्कातही सूट जाहीर करण्यात आली आहे.

‘या’ तारखेपर्यंत घेता येईल लाभ !

बँक ऑफ बडोदाच्या मते, ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे. हे दर 26 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत लागू असतील. हे दर नवीन कार खरेदीवर आहेत. कार लोन घेणाऱ्याच्या क्रेडिट प्रोफाइलवरही त्याला कार कर्ज कोणत्या दराने मिळेल हे अवलंबून असेल.

याशिवाय, बँक ऑफ बडोदा कार कर्जावर निश्चित व्याज दर देखील ऑफर करते, जे 8.85 टक्क्यांपासून सुरू होते. याशिवाय, फ्लोटिंग आणि निश्चित दर पर्यायांवरील प्रक्रिया शुल्कावर सवलत असेल. ही कर्जे कमाल 84 महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जातील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe