Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये पुणे महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात, पंधरा प्रवासी जखमी

Published on -

अहमदनगर पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. यातील वाहनचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी : गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास अहमदनगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील कैलास गाडीलकर यांच्या पेट्रोल पंपासमोर ट्रक (एम एच -१६ सीडी ९५५०) महामार्ग ओलांडून पुण्याच्या दिशेने जात असताना

त्याच वेळी पुण्याच्या दिशेकडून अहमदनगरच्या दिशेने जात असलेली चिंतामणी ट्रॅव्हल कंपनीची खासगी बस (क्रमांक एम एच २९ बीई ००९९) ही बस त्या ट्रकवर जोरात आदळली. या अपघातात बस चालकासह १५ प्रवासी जखमी झाले आहेत. यात बसचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. इतर जखमींना सुपा, अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण अव्हाड फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.

त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. यावेळी पीआय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार इगळे, रमेश शिंदे, रुग्णवाहिका चालक सादिकभाई यांनी सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe