Cheapest Smartphones : भारतीय मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांकडून त्यांचे शानदार स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. तसेच दिवसेंदिवस स्मार्टफोनच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. महागाई वाढत असल्याने स्मार्टफोनच्या किमती देखील वाढल्या आहेत.
तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे मात्र बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांकडून त्यांचे स्वस्त आणि सर्वोत्तम फीचर्स असलेले स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत.
Samsung Galaxy M13
सॅमसंग स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे अनेक शानदार स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. तुमचे बजेट कमी असेल आणि चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Galaxy M13 स्मार्टफोन उत्तम पर्याय आहे.
स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ LCD Infinity O डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10000 रुपयांपेक्षा कमी आहे. फ्रंटला 8MP कॅमेरा आणि मागील बाजूस 50MP ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे.
POCO M6 Pro 5G
बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी POCO M6 Pro 5G स्मार्टफोन उत्तम पर्याय आहे. स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.79-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10000 रुपये आहे.
Redmi 13C
Redmi 13C स्मार्टफोन देखील कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे. स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 50MP प्राथमिक सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि आणखी 2MP लेन्ससह ट्रिपल कॅमेरा हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत 10000 रुपये आहे.
Realme C53
Realme C53 स्मार्टफोनची किंमत 10000 रुपयांपेक्षा कमी आहे. स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाचा 90Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 108MP अल्ट्रा क्लिअर कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP AI सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.